आ. वैभव नाईकांनी घेतले कुणकेश्वराचं दर्शन..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 08, 2024 11:53 AM
views 243  views

देवगड : कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी  उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. तदनंतर श्री कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व मंदिराची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी हरी खोबरेकर, सचिन आचरेकर, गणेश गावकर आदी उपस्थित होते.