आ. वैभव नाईक यांनी शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 25, 2023 20:08 PM
views 659  views

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार  हे कोल्हापूर येथील पक्षाच्या सभेसाठी आले असता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी  कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत  शरद पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा करत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

यावेळी माजी मंत्री बंटी पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,श्रीनिवास पाटील, कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख  विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, रविकिरण इंगवले आदी उपस्थित होते.