
देवगड : शिरगाव गावठण येथील श्री सेवकांच्या बैठकीच्या रस्त्यावर काळोखाचे साम्राज्य होते, हि समस्या सोडविण्यासाठी आ. नितेश राणे यांच्याकडून दोन सौर दिप उपलब्ध करून देण्यात आले. त्याचे लोकार्पण सेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, उपसरपंच संतोष फाटक, युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, मंगेश लोके, विश्वनाथ माळवदे, प्रदीप वाडये, दाजी राणे, वैभव साळस्कर, संजय शिंदे, मंगेश शिंदे, केतन धुळप, बाबू शिरोडकर, युधिराज राणे, आशिर्वाद कुबडे आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईटची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवक आणि ग्रामस्थांनी आमदार नितेशजी राणे यांचे आभार मानले.