विकसित भारत संकल्प यात्रेत आ. नाईकांनी केली प्रश्नांची सरबत्ती

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 16, 2024 05:40 AM
views 285  views

मालवण : मालवण तालुक्यातील माळगाव येथे रविवारी विकसित भारत संकल्प यात्रा दाखल झाली असता त्याच दरम्यान आ. वैभव नाईक हे तेथून जात असताना त्यांनी गाडी थांबवून यात्रेची  पाहणी केली. यावेळी संकल्प यात्रेत लावलेली स्क्रीन नादुरुस्त होती  स्क्रीनवरील मजकूर स्पष्ट दिसत नव्हता.

तसेच त्याचा आवाजही येत नव्हता. याठिकाणी उपस्थित असलेल्या महिला नागरिकांशी आ. वैभव नाईक यांनी संवाद साधत केंद्राच्या किती योजनांचा लाभ आपल्याला मिळाला अशी विचारणा  केली. यावेळी महिलांना योजनाच माहित नसल्याचे समजले. केवळ योजेनचे कॅलेंडर वाटण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आ. वैभव नाईक यांनी पुन्हा प्रश्न करत महागाई वाढली आहे का? अशी विचारणा महिलांना केली. त्यावर महिलांनी होकारार्थी उत्तर देत १२०० रु सिलेंडर झाला असल्याचे सांगत सर्वच गोष्टीत महागाई वाढली आहे असे सांगितले. १५ लाख रु किती जणांच्या खात्यात जमा झाले अशीही विचारणा आ. वैभव नाईक यांनी केली.  यांनतर ताबडतोब यात्रा गुंडाळण्यात आली.

त्यामुळे सरकारकडून बोलघेवड्या योजना जाहीर करून  केवळ नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे यावेळी निदर्शनास आल्याचे आ. नाईक यांनी सांगितले.  याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, पंकज वर्दम, अमित भोगले, रुपेश वर्दम, पराग नार्वेकर,विजय पालव आदी उपस्थित होते.