आ. नितेश राणेंनी घेतले शिरगावच्या राजाचं दर्शन...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 26, 2023 15:13 PM
views 186  views

देवगड : देवगड तालुक्यातील एकमेव अश्या सार्वजनिक गणेशोत्सव असलेल्या शिरगावच्या राजाचे आमदार नितेश राणे यांनी दर्शन घेऊन कृपा आशीर्वाद घेतले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे 74 वे वर्ष आहे. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे मंडळाचे अध्यक्ष राजाराम साटम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाराम साटम, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, मंगेश लोके, भाजपा युवा मोर्चाचे देवगड तालुका अध्यक्ष अमित साटम, देवगड पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद देसाई, प्रसिद्ध भजनी बुवा सुशील गोठणकर, गुप ग्रामपंचायत शिरगाव शेवरेचे सरपंच समीर शिरगावकर, उपसरपंच संतोषकुमार फाटक, ग्रामपंचायत सदस्य मंगेश धोपटे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.