
कणकवली : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश नारायण राणे यांनी शयन आसनी बसेसचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने कणकवली बस स्थानकाला भेट दिली. यावेळी कणकवली बस स्थानक येथील सर्वसामान्य लोकांप्रमाणे रसवंती केंद्रांवर बसून उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. अनेक प्रवाशांनी आमदारांसोबत सेल्फी काढत भेटी घेतल्या. पुन्हा एकदा आ.नितेश राणे यांनी आपल्या कृतीतून साधेपणा दाखवून दिल्याने कौतुक होत आहे. यावेळी त्याच्या समवेत सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, यांच्यासह भाजप कार्यकर्ते व एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.