आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार | नगराध्यक्षा नेहा माईणकर आणि नगरपंचायतीच आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 20, 2023 13:39 PM
views 114  views

वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाच २३ जून रोजी सकाळी ११ वा भाजपा कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

आ. नितेश राणे यांचा २३जून रोजी वाढदिवस आहे.हा वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे.या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरपंचायत वाभवे- वैभववाडी  व नगराध्यक्षा यांच्या वतीने १० वी व १२ परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.येथील भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी,पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी केले आहे.