आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंदे-गावडेवाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Edited by:
Published on: October 25, 2024 05:55 AM
views 426  views

कुडाळ : मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक भाजपला धक्क्यावर धक्के देत आहेत. कुडाळ तालुक्यातील कुंदे-गावडेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते कुंदे  गावातील विकासकामांना प्राधान्य देतील, असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला. त्या बद्दल विशेष ऋण व्यक्त करत कुंदे गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना दिला आहे. यावेळी अनंत गावडे,अनिल खंदारे अशोक गावडे,अक्षय गावडे,विनायक गावडे,कृष्णा कासले या प्रमुख भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी उपतालुकाप्रमुख सचिन कदम,उपविभागप्रमुख राजेंद्र घाडीगावकर,कुंदे सरपंच रुपेश तायशेटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.