आ. वैभव नाईक यांच्या ऑफिस शेजारी स्टॉल लावण्यावरून ऐकाला मारहाण

मारहाणीमध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत
Edited by:
Published on: March 21, 2023 21:54 PM
views 644  views

कणकवली : आ.वैभव नाईक यांच्या कार्यालया शेजारी स्टॉल धारकाला मारहाण झाली असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे.कणकवली गडनदी पुलाशेजारी रस्त्यावर स्टॉल लावण्यावरून आपल्यास मारहाण झाली असल्याचे  स्टॉल धारक रमेश वर्दम  वय 66 यांनी सांगितले. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली असून हि मारहाण कोदे नामक दांपत्य यांनी आपल्याला केली असल्याचे वर्दम म्हणाले व कणकवली पोलिसात आपण त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कोदे दांपत्य  देखील पोलीस ठाण्यात दाखल होत आपली तक्रार दाखल करत होते.

रस्त्यावर स्टॉल लावण्यावरून ही मारण झाली असल्याचे समजत आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.