
मालवण : कोळंब ग्रामपंचायतची नळपाणी योजना ऐन पावसाळ्यात ठप्प झाल्याने ग्रामस्थाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गणेश चतुर्थीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. किमान गणपती उत्सवात तरी मुबलक प्रमाणात ग्रामस्थांना पाणी मिळेल का? असा सवाल ग्रामस्थां मधून उपस्थित केला जात आहे.
मालवण कोळंब ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चेत राहिली आहे. सध्या पावसाळी दिवस असूनही कोळंब गावात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. गेले 12 दिवस गावात पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होतं आहेत. दरम्यान येणाऱ्या गणपती सणासुदीच्या दिवसात तरी कोळंब ग्रामस्थांना पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.