
मालवण : कोळंब ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कार्यरत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक कामे सुद्धा ग्रामसेवकाअभावी प्रलंबीत आहेत. त्यामुळे तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, विशाल फणसेकर, उज्वला करलकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या शाळा, कॉलेज सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांना दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र, कोळंब ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक कार्यरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. गावातील अनेक कामे देखील प्रलंबीत आहेत. ग्रामसेवक नसल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, विशाल फणसेकर, उज्वला करलकर यांनी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा अशी मागणी केली आहे.