
सावर्डे : कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डे या महाविद्यालयात १९८४ पासून माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा १८ जानेवारी २०२५ रोजी सावर्डे येथे उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा तब्बल ३९ वर्षांतील एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वाच्या चेहर्यावर दिसत होता. प्रारंभी शिक्षण महर्षी स्व गोविंदराव निकम साहेब यांच्या प्रतिमेला पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयाच्या चेअरमन सौ.पूजाताई शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व MSCDA चे खजिनदार आणि AIOCD चे सहसचिव वैजनाथ जागुष्टे, मिलिंद लांडगे, गजानन मोहिते ,सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, तसेच संचालक मारुती घाग, अनिरुद्ध निकम, रशियन पाहुणे ऑलीवर मर्चंट, प्रकाश राजेशिर्के ,डॉ. वैशाली पाटील , विश्वनाथ मस्के आदीं उपस्थित होते. गुरूपेक्षा शिष्य मोठ्या पदावर गेला तर गुरुचे ज्ञानाचा मोठेपणा असतो, असे मत प्रा.रुची भुरण यांनी व्यक्त केले. प्राचार्य देसाई यांनी प्रास्ताविकात जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा.रूची भुरण यांनी आणि आभार प्रा.श्रीमती जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.