विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 22, 2024 12:52 PM
views 157  views

 सिंधुदुर्गनगरी : शासकीय कामकाजानिमित्त जिल्हा प्रशासनातील अधिकारी जिल्ह्यातील अनेक भागाला भेटी देत असतात.  या दौऱ्या दरम्यान प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जिल्हा परीषद तसेच खाजगी शाळांना भेट देऊन शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधावा.

 विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण होईल आणि त्यांना शिक्षण घेताना प्रेरणा मिळेल. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय दौऱ्यादरम्यान स्थानिक शाळांना भेटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशारे तावडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना केले आहे.