जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केल अभिवादन

कणकवली बौद्ध विहार येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला केला पुष्पहार अर्पण
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 14, 2023 12:27 PM
views 472  views

कणकवली : जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कणकवली बौद्ध विहार येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कणकवलीत तहसीलदार आर. जे. पवार, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. सिंधुदुर्गातही विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या जयंती निमित्त राबवण्यात येत आहेत. तसेच शासनाने देखील त्यांनी केलेले काम समाजापर्यंत पोहोचावे यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले आहेत.