
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी करुळ (आज ता.३१) घाट मार्गाची पाहणी केली.घाटातील अपुर्ण कामे १० जुनपर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत.
करुळ घाटमार्गाचे रुंदीकरण व कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.या कामांकरिता २२जानेवारी पासून हा घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पावसाळ्यापुर्वी घाटमार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याकरिता प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून आहेत. त्यांनी आज घाटात भेट देऊन कामाचा आढावा घेतला. १०जून पुर्वी अपुर्ण कामे पूर्ण करण्याबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदार कंपनीला सुचना दिल्या. मागील महीन्यातही श्री.तावडे यांनी घाटाची पाहणी केली होती.आज पुन्हा येऊन घाटात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकरी अभियंता लक्ष्मण जाधव, विभागीय अभियंता अतुल शिवनीवार, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, सार्वजनिक बांधकामचे व्हि व्हि जोशी आदी उपस्थित होते.