संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण

Edited by: विनायक गावस
Published on: August 31, 2023 14:42 PM
views 142  views

सावंतवाडी : नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करत नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचं पूजन करण्यात आल. त्यानंतर नारळ मोती तलावात सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला.

सालाबादप्रमाणे सावंतवाडी पोलिसांनी मानाचा नारळ शहरातून वाजत गाजत मोती तलाव काठावर आणला‌. सावंतवाडी संस्थान व मानाच्या नारळाची पुजा राजेसाहेब खेमसावंत भोंसले व पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली‌. त्यानंतर सोन्याचा नारळ पाण्यात अर्पण करण्यात आल्यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी नारळ अर्पण केले. यावेळी मोती तलाव भोवती मोठी गर्दी पहायला मिळाली. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा नारळ देखील यावेळी तलावात अर्पण करण्यात आला.

यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना परब, पुजा दळवी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दिलीप भालेकर, श्री. कोतनीस, सोमण गुरूजी, आदींसह सावंतवाडी पोलिस, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.