
बहीणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना 'जोडा' हाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सावंतवाडी : दीपक केसरकर म्हणजे ऑल राउंडर, सचिन तेंडुलकर आहेत. विजयाचा चौकार मारून सावंतवाडीचा कप ते निश्चितच उचलतील. माझ्यासाठी ते फायर फायटर सारखे आहेत. चक्रव्यूह कसा भेदायचा ? हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचा अभिमन्यू होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी नितेश-निलेश राणे आणि दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन शिंदेंनी केले. कोकणातील सर्व आमदार हे महायुतीचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. पावसानं देखील आशीर्वाद दिल्याचा दावा त्यांनी केला. सावंतवाडी येथील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, संपूर्ण राज्यात मी सभा घेत आहे. दीपक केसरकर यांच्या हातात धनुष्यबाण आला आहे. हॅट्रिकनंतर आता ते चौकार मारणार आहेत. विजयाचा चेंडू स्टेडियम बाहेर जाणार आहे. मतदारसंघात गेली पंधरा वर्षे त्यांनी चांगलं काम केलं आहे. सुसंस्कृत, शांत, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर असणारा हा माणूस आहे. गुवाहाटीत चांगल काम त्यांनी केलं आहे. कोकण आणि बाळासाहेब असं समीकरण आहे. नारायण राणे यांनी त्या काळात बाळासाहेबांचे विचार इथल्या घराघरात पोहचवले. कोकणी माणसावर त्यांनी भरभरून प्रेम केले. कोकणी माणूस काटेरी असला तरी गोड गऱ्यासारखा आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी करत अनैसर्गिक आघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. धनुष्यबाण कॉग्रेसच्या दावणीला बांधला. त्यावेळी मी उठाव केला. सत्तेचा त्याग केला. केसरकर यांनी त्यावेळी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली. दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण केली. केसरकर म्हणजे ऑल राउंडर, सचिन तेंडुलकर आहेत. विजयाचा चौकार मारून सावंतवाडीचा कप ते निश्चितच उचलतील. माझ्यासाठी ते फायर फायटर सारखे आहेत. चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचा अभिमन्यू होणार नाही. लोकसभेत इथल्या लोकांनी नारायण राणेंना भरघोस मतांनी निवडून दिलं. विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोकणी माणसाने नाकारलं असं शिंदे म्हणाले.
दरम्यान, केसरकर आणि राणे एकत्र आलेत हा विजयाचा शुभशकून आहे. त्यामुळे निलेश राणेंचाही विजय पक्का आहे. लाडक्या बहिणींना वंचित ठेवणार नाही. सरकार आल्यानंतर लगेचच सगळ्या लाडक्या बहीणांना योजनेचा लाभ मिळेल. आमचं सरकार देणार आहे. लेना बँक प्रकार, आमचा नाही. हाप्ते घेणार, जेलमध्ये जाणार हे सरकार नाही. विरोधक सावत्र भाऊ बनून आडवे येतील म्हणून नोव्हेंबरचा निधी ऑक्टोबरलाच दिला. दिला शब्द पाळणारी आम्ही लोक आहोत. बाळासाहेब, दीघेसाहेबांचे आम्ही शिलेदार आहोत. महायुतीचा वचननामा आम्ही सादर केला. लाडक्या बहिणींना २१०० रूपये, शेतकऱ्यांना योजना, ५० हजार महिलांची पोलिस भरती आम्ही करत आहोत. ज्येष्ठ, विद्यार्था यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतलेत. ४ लाख लोकांना जर्मनीत नोकऱ्या देण्यात दीपक केसरकर यांचा मोठा वाटा आहे. अनेक धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले आहेत. शेतकऱ्यांच वीजबिल माफ, घरगुती बिलांत ३० टक्के मुभा दिली. आम्ही अडीच वर्षांत सगळं सुरू केलं, स्थगिती उठवली. महाविकास आघाडीन केवळ बंद करण्याचे काम केलं. लाडकी बहीणची चौकशी लावू असे म्हणाले. एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय. जेलमध्ये टाकायच्या धमक्या मला देऊ नका. मला हलक्यात घेऊ नका तुमचा टांगा पलटी करून सामान्य माणसांच्या मनातल सरकार आम्ही आणल. हिताच्या योजना सुरू केल्या. आमचं सरकार आल नसतं तर या योजना सुरू झाल्या नसत्या. लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविल्याशिवाय राहू नका. पैशात लोळणाऱ्यांना गरीबीची झळ कळणार नाही असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींनी देशाचा सर्वांगीण विकास केला. केंद्रात आपलं सरकार आहे. त्यामुळे माझी लाडकी बहीण, शेतकरी, ज्येष्ठ, बंधू महायुतीचे उमेदवार विजयी करतील असा विश्वास व्यक्त करत निवडणूका झाल्यानंतर गळ्यात कॅमेरा अडकवून ठाकरेंना जंगलात पाठवा अस विधान केलं.
तर, दीपक केसरकर यांनी कोट्यावधीची विधायक काम केली. पर्यटनाला आपण चालना देत आहोत. कोकण एक्स्प्रेस, महामार्गाला चालना देत आहोत. कोकणातील बॅकलॉग भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण निर्माण केल आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी नितेश राणे, निलेश राणे आणि दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल. कोकणातील सर्व आमदार हे महायुतीचे असतील असा विश्वास व्यक्त केला. पावसानं देखील आशीर्वाद दिल्यानं आपला विजय पक्का आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी चौक येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, युवराज लखमराजे भोंसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुरेश गवस, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक दत्ता सामंत, संजू परब, केरळचे अँड. हरीकुमार आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.