नागरिकांच्या इशाऱ्यानंतर तो मार्ग मोकळा !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 24, 2023 18:54 PM
views 167  views

सावंतवाडी : मंगळवारी शहरातील जुनाबाजार येथील अश्वत्थ मारूती माठेवाडा येथील पिंपळ वृक्ष कोसळून मंदीरासमोरील पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले होते. सुदैवान यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, झाड कोसळल्यान रस्ता बंद करण्यात आला आहे. शेजारीच जिल्हा परिषद शाळा असल्यान मुलांना याचा फटका बसत होता. ‌

बुधवारी सकाळी आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनी याठिकाणी नगरपरिषदेची माणसं पाठवत झाड हटविण्यासाठी व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी हे काम रोखल. त्यामुळे गेले ५ दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. यामुळे शाळकरी मुलांसह येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या प्रकाराबाबत येथील रहिवासी बबलू मिशाळ, सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांसह शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त करत सोमवार पर्यंत रस्ता मोकळा न झाल्यास शालेय मुलांची  मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात भरवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अखेर नगरपरिषदेकडून सोमवारी सकाळी हा मार्ग मोकळा करून देण्यात आला‌