स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत कणकवली नगरपंचायत कडून स्वच्छता रॅली..!

स्वच्छता मोहीम व पथनाट्य कार्यक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 14, 2023 17:00 PM
views 161  views

कणकवली : स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत कणकवली नगरपंचायत कडून स्वच्छता रॅली काढण्यात आली.  या रॅलीची सुरुवात पटकी देवी मंदिर येथून सुरुवात करून पटवर्धन चौक पर्यत  काढण्यात आली. यामध्ये प.पू.भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्र.3 चे विध्यार्थी यांच्या कडून पटवर्धन चोॅक येथे स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच बुद्ध विहार येथे स्वच्छता मोहीम घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला.

तसेच स्वच्छता आणि माझी वसुंधरा या विषयी शपथ घेण्यात आली. यावेळी प्रशासक तथा प्रांतधिकारी श्री जगदीश कातकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, स्वच्छ सर्वेक्षण ब्रँड अँबेसिडर  दीपक बेलवळकर,कणकवली नाईट राईडर कॅप्टन अमोल भोगले, रोटरी अध्यक्ष रवी परब, रोटरी सदस्य नितीन बांदेकर, महेंद्र मुरकर, कणकवली कॉलेज NCC प्रमुख राठोड सर, कणकवली नगर पंचायत कर्मचारी किशोर धुमाळे, सोनाली खेरे, मनोज धुमाळे, विनोद सावंत, ध्वजा उचले, विभव करंदीकर, प्रियांका सोनसूरकर, सतिश कांबळे,वर्षा कांबळे, संदीप मुसळे, रुचिता ताम्हाणेकर, प्रवीण गायकवाड, निकिता पाटकर, सचिन नेरकर, प्रशांत राणे, माधुरी डगरे इतर नगर पंचायत कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कणकवली कॉलेज, विद्यामंदीर हायस्कूल,प.पू.भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्र. 3 चे विध्यार्थी,  रोटरी सदस्य व इतर नागरी मोठया संख्येने उपस्थित होते.