
सावर्डे : विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची जाणीव व्हावी श्रम प्रतिष्ठा निर्माण व्हावी त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेमुळे सुंदर गाव स्वच्छ गाव ही कल्पना प्रत्यक्षात अमलात येईल व स्वच्छतेच्या सवयी विद्यार्थ्यांना अंगी बनवता येतील या उद्देशाने ग्रामस्थ, विद्यार्थी शिक्षक एकत्रितपणे स्वच्छता अभियानाचे उपक्रम सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची भाग शाळा खरवते यांनी ग्रामदैवत सुकाई मंदिर परिसरात आयोजन केले होते. या माध्यमातून समाजात स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे व पर्यावरण संवर्धन करणे हा उद्देश आहे.
या विद्यालयाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यालयाचे कर्मचारी,विद्यार्थी यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने कळवंडे येथील सुकाई मंदिर परिसराची स्वच्छता केली यावेळी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अशोक पाटील दादासाहेब पांढरे, प्रतीक घाग संजय मेस्त्री सौ वैभवी भुवड श्री नागले उपस्थित होते. सामाजिक स्वच्छतेतून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला तसेच आपल्या घराभोवतालचा परिसर स्वच्छ करण्याचा निश्चय केला, स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली तर रोगराई साथीचे आजार पसरत नाहीत तसेच साप विंचू यांचा वावर सुद्धा राहत्या ठिकाणच्या परिसरामध्ये होत नाही त्यामुळे सामाजिक सुरक्षितता टिकून राहते, पर्यावरण संवर्धन होते या उपक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांनी प्रेरणा दिली असून सावर्डे परिसरातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल जनजागृती केली आहे. विद्यार्थ्यांच्या या स्वच्छता उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. विद्यार्थी कर्मचारी व ग्रामस्थ सुकाई मंदिर परिसराचे स्वच्छता करताना