
वेंगुर्ले : १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियाना अंतर्गत अणसुर ग्रामपंचायत आणि बहर महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात मंदिरे, शाळा अंगणवाडी, विहिरी, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत, शासकीय इमारती, रस्ते यांची साफसफाई करण्यात आली.
या स्वच्छता अभियानामध्ये गावातील महिला, पुरुष, भाजप पदाधिकारी यांच्यासहित सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य प्रज्ञा गावडे, सीमा गावडे, संयमी गावडे, वामन गावडे, भाजप पदाधिकारी बिटू गावडे कर्मचारी सोनू गावडे, सीआरपी शिला देवूलकर, विठ्ठल वारंग, उदय गावडे, सतीश गावडे, अंकुश तेंडोलकर अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांनी भर पावसात साफसफाई केली. या अभियानाच्या निमित्ताने सर्व महिलाना, ग्रामस्थांना "एक पेड माँ के नाम, झाडे लावा झाडे जगवा" या संकल्पनेतून १०० कडुनिंबाची झाडे वाटप करण्यात आली. कार्यक्रमच्या समाप्ती नंतर सरपंच सत्यविजय गावडे, भाजपा पदाधिकारी किसान मोर्चा सदस्य आनंद ( बिटू) गावडे यांनी सर्व महिला ग्रामस्थ यांचे मनापासून आभार व्यक्त केले.