
देवगड : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या आदेशानुसार तांबळडेग ग्रामपंचायतच्या वतीने समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,
तांबळडेग समुद्र किनारी पर्यटकांची वर्दळ मोठ्या संख्येने असते, शालेय विद्यार्थी,ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या श्रमदानातून प्लॅस्टिक कचरा एकत्रित करण्यात आला आहे, शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा तांबळडेग विद्यार्थ्यांच्या वतीने प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली,
यावेळी सरपंच अंजिता कोचरेकर, उपसरपंच लवेश भाबल,सागर मालडकर,शंकर भाबल,सदाशिव फाले,विष्णू धावडे,राजेंद्र येरागी,ग्रामसेवक आर.व्ही भुर्के,सुनीता येरम,प्रणाली पेडणेकर,शीतल कोचरेकर,गीतांजली कोचरेकर,सुरेश सरवणकर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते,
उपस्थितांना ग्रामसेवक व्ही.आर भुर्के यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले,तांबळडेग बीचवर पर्यटकांची वर्दळ कायम असल्याने स्वच्छता मोहिमेतून पर्यटकांच्या स्वागतासाठी तांबळडेग बीच सज्ज झाले आहे,