
दोडामार्ग : कसईनाथ डोंगरावर दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वच्छता मोहीम संपन्न झाली. या मोहिमेत महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना विभागाची विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.
सह्याद्रीच्या रांगते दोडामार्ग तालुक्याचा महामेरू असलेल्या कसाईनाथ डोंगरावर पांडवकालीन मंदिर आहे यामध्ये शंकराची पिंडी असल्याने दरवर्षी गोवा व महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भाविक या डोंगराला दरवर्षी भेट देत असतात विशेष करून श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रांग असते यामध्ये शाळा महाविद्यालय, भाविक, पर्यटक, पर्यावरण तज्ञ असे अनेक लोक या ठिकाणी भेट देत असतात हे क्षेत्र गोवा व महाराष्ट्र राज्यातील एक मोठे पर्यटनाची स्थळ होऊ शकते या अशा निसर्ग संपन्न कसाईनाथ डोंगराची नैसर्गिक शान जपून ठेवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाने आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय खडपकर, माजी विद्यार्थी संघटनेच सचिव भूषण सावंत, महाविद्यालयाच कर्मचारी तुकाराम शेटकर ,तन्मय नाईक , श्याम खडपकर महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक ,माजी विद्यार्थी आंबेली गावातील ग्रामस्थ तसेच पर्यटक उपस्थित होते.