
वैभववाडी : डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या येथील श्री सदस्यांनी येथील कोकिसरे दत्तमंदीर परिसरात आज (ता.१)स्वच्छता मोहीम राबविली. या मोहीमेत मोठ्या संख्येने सदस्य सहभागी झाले होते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन वर्षभर विविध ठिकाणी अशा स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले जाते.
डॉ.धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडातर्गंत समर्थ बैठक वैभववाडी, श्री समर्थ बैठक बांधवाडीचे श्री सदस्य,आणि खांबलवाडी कोकिसरे ग्रामस्थांनी आज गांधी जयंतीनिमित्त कोकिसरे येथील श्री दत्तमंदीरात स्वच्छता मोहीम राबविली. शेकडो स्वच्छता दुत या उपक्रमात सहभागी झाले होते. सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजेपर्यत ही स्वच्छता सुरू होती.