
चिपळूण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अंतर्गत भारत देशाचे स्वच्छतादूत डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण श्री सदस्यांनी रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छता मोहीम राबवून दोन तासात तब्बल साडेसहा टन कचरा गोळा केला.यामुळे हा परिसर पूर्णपणे साफ व स्वच्छ झाल्याचे दिसून आले. स्वच्छता हि सेवा २०२४ यामध्ये देशात १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या पंधरवड्यात राबविण्यात येत असलेल्या "स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता" या उपक्रमा अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने चिपळूण येथे चिपळूण नगरपालिका कार्यालय ते बहादुर शेख नाका दुतर्फा रस्ता साडे सहा कि मी. सकाळी ७ ते साडे नऊ यावेळेत स्वच्छता अभियान रबिविण्यात आले.
या अभियानात एकूण १०६ सदस्यांनी सहभाग घेऊन साधारण साडे सहा टन कचरा गोळा केला.श्री सदस्यांनी मास्क,फावडे,घमेली, पिशव्या,झाडू आदी साहित्या सह याठिकाणी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मंगेश पेढामकर प्रशासकीय अधिकारी,महेश जाधव- स्वच्छता निरीक्षक,सुजित जाधव- स्वच्छता निरीक्षक,प्रसाद साडविलकर - उद्यान प्रमुख,वलिद वांगडे खातेप्रमुख,विजय गमरे व त्यांचे सहकरी उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याना प्रतिष्ठान मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाची माहिती देण्यात आली.यावेळी नगरपालिकेचे मोलाचे सहकार्य मिळाले.