
वैभववाडी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. माधवराव पवार विद्यालय व एसटी महामंडळ यांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गुरुवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. शहरातील बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. माधवराव पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकाच्या संपूर्ण परिसराची साफसफाई केली. यामुळे संपूर्ण परिसर चकाचक झाला होता. यावेळी वाहतूक नियंत्रक बाबूराव गुरखे, प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते.