
वेंगुर्ला : संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून जबरदस्त सांस्कृतिक कला - क्रीडा मंडळ राऊळवाडा, वेंगुर्ला यांच्यावतीने येथील सागरेश्वर मंदिर व समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवले. यावेळी जमा झालेला कचरा वर्गीकरण करून वेंगुर्ले नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी अजित राऊळ, स्वप्नील पालकर, मंगेश परब, कौशल मुळीक, विजू आंदूर्लेकर, चंदन रेडकर, आबा रेडकर, रसिक वेंगुर्लेकर, अनिकेत वेंगुर्लेकर, सुनील नांदोडकर, हर्षद रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, दिनेश पाटील, शुभम बोवलेकर, विवेक नाईक, मंथन रेडकर, अनिकेत माडये, अक्षया राऊळ आदी उपस्थित होते.