
वैभववाडी : तालुक्यातील एका व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. यात मध्यस्थी करायला गेलेल्या इसमाला मारहाण झाली. त्यात तो जखमी झाला आहे. हा प्रकार आज दुपारी ३.३०च्या दरम्यान घडला आहे. त्यांच्या या हाणामारीला तेथील गावच्या पुर्ववैमन्यस्याचा संबंध असल्याचे बोलले जात आहे.
एका महाविद्यालयाच्या दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.त्यांच रुपांतर हाणामारी झाल. या हाणामारीत एका गटाने तेथील स्थानिक तरुणांकरवी दुसऱ्या गटाला बेदम मारहाण केली.हा प्रकार भर रस्त्यावर सुरू होता.या दरम्यान वाहन घेऊन येणा-या एका इसमाने हा प्रकार काय चालू आहे असे विचारले त्यालाही त्या तरुणांनी मारहाण केली.त्याला गंभीर दुखापत झाली आहे.या प्रकारानंतर पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी एक गट दाखल झाला होता.