पेडणेत २५ जानेवारीपासून सिनेमा लॅब६ 'फिल्ममेकींग वर्कशॉप'

पेडणेकर प्रोडक्शनचे आयोजन | दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांची प्रमुख उपस्थिती
Edited by:
Published on: January 08, 2024 20:40 PM
views 525  views

पेडणे : पेडणे येथील पेडणेकर प्रोडक्शन यांच्या माध्यमातून लेखक आणि दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांच्या सिनेमा लॅब६ या "फिल्ममेकींग वर्कशॉप"चे आयोजन पेडणे येथे करण्यात आले आहे. हे वर्कशॉप २५ ते २८ या काळात पेडणे येथे होणार आहे.

कोकण आणि गोव्यातील मुलांना वेगळे काही तरी शिकता यावे या उद्देशाने या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पेडणेकर प्रोडक्शनचे सागर पेडणेकर यांनी दिली. यात प्रशिक्षण देणारे श्री. इंडीकर यांनी बर्लीन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'क्रिस्टल बेअर' शांघाय 'एशियन न्यू टॅलेंट अवार्ड', यंग सिनेमा अवार्ड, राष्ट्रीय रजत कमल हा नॅशनल अवार्ड मिळवून यश संपादन केले आहे. त्यांच्या माध्यमातून या वर्कशॉप मध्ये जास्तीत-जास्त कलाकार आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पेडणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9527509737  या नंबरवर संपर्क साधावा.