
सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये 'नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. शाळेचे संचालक रुजूल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे स्वागत करण्यात आले. ईयत्ता १ ली ते ४ थीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चमचा - लिंबू, संगीत खुर्ची, तसेच फुगा व गोल रिंगचा वापर करून विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत वेशभूषा परिधान केली होती. तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरीता देखील संगीत खुर्ची स्पर्धा ठेवण्यात आली.
सर्व सणांप्रमाणे नाताळ या सणाचेही विद्यार्थ्यांना महत्त्व कळावे, याकरता सर्व विद्यार्थ्यांना नाताळाविषयी माहिती सांगण्यात आली. या दिवशी शाळेत सॅन्ताक्लॉझच्या आगमनाने सर्व विद्यार्थी आनंदित झाले. सर्व विद्यार्थ्यांना गोड पदार्थ वाटप करण्यात आले. शाळेत सजावट करण्यात आली. उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, मदतनीस आनंदाने या सणानिमित्त केलेल्या उपक्रमात सहभागी झाले व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.