गणेशोत्सव काळात चिरे वाहतूक बंद ठेवावी | विलास साळसकर यांचं देवगड तहसीलदारांना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 12, 2023 12:17 PM
views 201  views

देवगड : गणेशोत्सव संपेपर्यंत चिरे वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी. त्याचबरोबर त्यापुढील काळात गौण खनिज (चिरे) वाहतूक ही सायंकाळ नंतर सुरु ठेवण्याकरीता आवश्यक त्यासूचना व कार्यवाही करण्यात यावी याबाबतचे निवेदन  शिवसेना देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड तहसीलदार रमेश पवार यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यातील ठीकठीकाणी गौण खनिज़ (चिरे) साठे उपलब्ध असून त्यातील प्रमुख जांभा दगड (चिरे) यांचा व्यवसाय हा मोठया प्रमाणात केला जातो. देवगड तालुक्यातील बहुतांशी भागात या गौण खनिजांचे (चिरे खाण) साठे असून त्यांचा करोडो रुपयांचा व्यवसाय देवगड तालुक्यात चालतो. प्रसंगी यात अवैद्य  गौण खनिज उत्खनन देखील केले जाते.

महसूल खात्याच्या नियामांच्या अटी व शर्थी यांचे पालन केले जात नाही उत्खनन केलेल्या खणी बुजवणे व सभोवताली कठडा घालणे तसेच स्थानीकांना चिरे देण्याची टाळाटाळ प्रत्येक व्यवसाईकाकडून केली जात आहे. एकंदरीत या व्यवसायावरती महसूल व पोलीस यंत्रणेचे कुठेच नियंत्रण आढळून येत नसल्याकारणाने व्यवसाईकामध्ये बेफीकीरपणा व अरेरावी वाढलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्र व कर्नाटक मधील बहुतांशी भागात या गौण खनिजांची विक्री केली जाते. प्रसंगी या गौण खनिज उत्खननाचे परवाने हे मोठ्या प्रमाणात आगाऊ दिले जातात.

या गौण खनिज वाहतूकीकरीता 16 चाकी औजड वाहने पश्चिम महाराष्ट्र द कर्नाटकातून सिंधुदुर्ग जिल्हयात बहुतांशी  देवगड तालुक्यात मोठया प्रमाणात येतात दररोज येणाऱ्या गाडया कीती व जाणाऱ्या गाडया कीती याचा तपशील ना वहातूक पोलीस महसूल खाते यांच्याकडे कुठेही नोंद नाही चिरेखाण व्यवसाईकांना आगाऊ पास दिल्याकारणाने पासचा वापर होतो की नाही याबाबतही नोंद नाही व या वाहानांमधून चिऱ्यांची वाहतूक केली जाते. या वहानांकडे अधिकृत आवश्यक ती कागदपत्रेही उपलब्ध नसतात. अशा वहानानमधून गौण खनिज (चिरे) मंजूरी पेक्षाही अधीक वजनाने ओव्हरलोड वाहतूक केली जाते.

ही वाहाने अतीशय भरधाव वेगाने असल्याने अपघात घडतात. ही वाहतूक होत असताना देवगड निपाणी महामार्गावर वारंवार छोटे मोठे अपघात झालेले आहेत. यात छोटया वाहानांचे नुकसान व त्यातील प्रवासी यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. देवगड निपाणी महामार्गावरील तोरसोळे फाटा येथे अशाच एका 16 चाकी वाहानाने चारचाकी वहानाला धडक दिल्याने या अपघातात तळेबाजार येथील व्यवसाईक व त्यांची आई जागीच ठार झाले व त्याचबरोबर त्या वहानातील अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी असून गोवा येथे उपचार घेत आहेत. एकंदरीत या घटनांकडे पहाता अवैद्य  गौण खनिज उत्खनन (चिरे खाण) यांची ओव्हर लोड वहातूक ही महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या कृपाआशिर्वादाने अवैधरित्या  करण्यात येते.

तरी गौण खनिज उत्खनन परवाने तसेच वाहतूक पास वहातूक करणारी वहाने या सर्व कागदपत्रांची चौकशी व तपासणी करण्यात यावी व अवैद्य  गोष्टीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्हयात आगामी काळात गणेशोत्सवाचा सण हा मोठया प्रमाणात साजरा होत असल्याने या कालावधीत चाकरमानी (मुंबईकर) व गणेश भक्त मोठया प्रमाणात आपली वहाने घेवून येतात त्यामुळे या कालावधीत गणेशोत्सव संपेपर्यंत चिरे वहातूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी. त्याचबरोबर त्यापुढील काळात गौण खनिज (चिरे) वहातूक ही सायंकाळ नंतर सुरु ठेवण्याकरीता आवश्यक त्यासूचना व कार्यवाही करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे,याबाबतचे निवेदन  शिवसेना देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी देवगड तहसीलदार रमेश पवार यांना दिले आहे यावेळी महिला तालुकाप्रमुख  शितल सावंत,नीता गुरव,उप तालुकाप्रमुख स्वप्नाली बाल्मीकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.