
सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्या शुभहस्ते सकाळी ७:४५ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडासह स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच “विद्यार्थी हाही एक सैनिक असून, शिस्त आणि राष्ट्राभिमान जोपासणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे आवाहन केले.
उपप्राचार्य विजय चव्हाण, क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, प्रशांत सकपाळ, अमृत कडगाव यांसह सर्व शिक्षक व gv कर्मचारी उपस्थित होते. तीन दिवसांच्या ध्वजारोहण उपक्रमातील हा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला.