
चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तायक्वांदो तालुकास्तरीय स्पर्धा नुकतीच बांदल हायस्कूल चिपळूण येथे पार पडली. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील गंधर्व धने (17 वर्षे वयोगट) व मिहीर चव्हाण (14 वर्षे वयोगट) यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील एकूण 21 शाळांनी भाग घेतला होता. त्यामध्ये गंधर्व धने या प्रतिभावान खेळाडूने अतिशय चुरशीच्या स्पर्धेत दहा फाईट्स खेळत उत्तम कामगिरी करत ब्राँझ मेडल मिळवले. या कामगिरीने त्याने आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रोहित गमरे, अमृत कडगावे, प्रशांत सकपाळ व दादासाहेब पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम, सर्व संस्था पदाधिकारी सचिव महेश महाडिक शालेय समितीचे चेअरमन व ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रकुमार वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.