
चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निखिल चोरगे , प्राचार्य संकेत कदम,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शमिका चोरगे, ग्रामीण कृषि कार्यानुभव समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले .शिवकृषी संघातर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत वैजी गावात नुकत्याच एका उल्लेखनीय उपक्रमात गावातील कृषीदूतांनी एकत्र येऊन स्थानिक मंदिर परिसरात स्वच्छता आणि श्रमदानाचे कार्य केले. या उपक्रमात मंदिराच्या सभोवताली साफसफाई, गवत कापणे, कचरा गोळा करणे, झाडांना पाणी घालणे तसेच परिसरात सुशोभीकरण यांसारखी विविध कामे करण्यात आली.
कृषीदूत ही योजना शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कार्यरत असते. मात्र वैजी गावातील कृषीदूतांनी समाजिक जाणीव ठेवत मंदिर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. या उपक्रमात कृषीदूतांसह गावातील युवक, स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीचे काही सदस्यही सहभागी झाले होते.
या श्रमदानामध्ये सकाळी लवकरच सर्व स्वयंसेवक मंदिरात जमले. त्यांनी आपापले साधन-सामान घेऊन ठरवलेल्या जागांवर काम सुरू केले. मंदिराच्या आवारात असलेल्या गवताची योग्य कापणी करण्यात आली, कचरा गोळा करून विल्हेवाट लावण्यात आला, तसेच काही ठिकाणी रंगरंगोटी आणि साफसफाई करून परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक करण्यात आला. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून अनेकांनी कृषीदूतांचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे अभिनंदन केले. "आपण सर्वांनी मिळून आपल्या गावासाठी असे उपक्रम राबवले पाहिजेत," असे मत अनेकांनी व्यक्त केले.
येत्या काळात कृषीदूतांचा सहभाग इतर सामाजिक उपक्रमांमध्ये देखील घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.तरी या कार्याक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच आपले कृषिदुत प्रसाद पंडित, विनायक सावंत, साहिल जमदाडे, श्रेयस जमदाडे, सत्यजीत नांगरे, ओंकार नांगरे, सुहास पाटील, संग्राम माने, सुशांत पाटील, स्वप्नील तोडकर, संकेत चटके आणि श्रीशैल अवताडे उपस्थित होते.