
चिपळूण : भालचंद्र (चंदू) थत्ते, पाग-चिपळूण यांचे सुपुत्र श्री. जयेश थत्ते याने मुंबई विद्यापीठाच्या बी.ई. (Computer Science and Engineering – AIML) या शाखेत उल्लेखनीय यश मिळवले असून, त्याचा समावेश विद्यापीठाच्या पहिल्या दहामध्ये झाला आहे. त्याला 9.5 ग्रेड मिळाल्याची अधिकृत नोंद असून, या घवघवीत यशामुळे चिपळूणचे नाव विद्येच्या क्षेत्रात उजळून निघाले आहे. जयेशची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत विलक्षण आहे. चेन्नई येथे सीबीएससी पॅटर्नमध्ये दहावीला त्याला 95%, तर बारावीला 96.6% गुण मिळाले होते. पदवीच्या टप्प्यावरही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत उच्च स्थान पटकावले. त्याच्या या यशामागे वडील श्री. भालचंद्र (चंदू) थत्ते यांची प्रेरणा आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या श्री. थत्ते यांनी चिपळूण व चेन्नई येथील आघाडीच्या कंपन्यांत अधिकारी पदांवर उल्लेखनीय कारकीर्द बजावली आहे. वडिलांच्या आदर्शावर चालत जयेशनेही आकाशाला गवसणी घातली आहे. पदवी अभ्यासक्रमात उल्लेखनीय कामगिरीसोबतच जयेशने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही महत्त्वाची कामगिरी केली आहे.