
चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या राज्यातील आद्य आणि अग्रणी साहित्यसंस्थेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे यांची, तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात मसापच्या चिपळूण शाखेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची नवी कार्यकारिणी एकमताने निश्चित करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे
▪ अध्यक्ष : प्रा. संतोष गोनबरे
▪ कार्याध्यक्ष : धीरज वाटेकर
▪ उपाध्यक्ष : प्रा. सोनाली खर्चे, मनिषा दामले
▪ कार्यवाह : प्राची जोशी
▪ कोषाध्यक्ष : प्रकाश घायाळकर
समित्यांचे सदस्य
🔸 स्पर्धा समिती : रविंद्र गुरव, प्रदीप मोहिते, दीपक मोने
🔸 कार्यक्रम समिती : शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी, समीर कोवळे, कैसर देसाई
🔸 वाङ्मय समिती : मुझफ्फर सय्यद, महम्मद झारे, स्नेहा ओतारी
मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून चिपळूण शाखेतून आगामी काळात विविध साहित्यविषयक स्पर्धा, परिसंवाद, चर्चासत्रे व सांस्कृतिक उपक्रम राबवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. या वेळी मसाप कोकण विभागाचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, समीक्षक अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.