आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नातून जि. प. शाळा पाग येथील कंपाऊंड ऑलचं भूमिपूजन

Edited by:
Published on: June 01, 2025 18:51 PM
views 148  views

चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून चिपळूण नगर परिषद हद्दीतील विशिष्ट नागरी सेवा व अन्य सुविधा या योजनेअंतर्गत पाग मराठी शाळा येथे शाळेला कंपाऊंड ऑल बांधणे व खेळाचे मैदान विकसित करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा, चिपळूण पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम यांच्या शुभ हस्ते झाला.

यावेळी पाग भागात अनेक विकास कामे झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगरसेवक मिथिलेश ऊर्फ विकी नरळकर,  प्रमोद ठसाळे ,नैनेश तांबडे आदींनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रम प्रसंगी अनिल गोरीवले, राजन चिले, नैनेश गोरीवले, महादेव चिले,अनंत जाधव,सुनिल चिले, अनंत शिंदे, माधव खेडेकर, संदेश गोरीवले, प्रथमेश गोरीवले, अभिनव गोरीवले, अमेय चितळे, कोतवडेकर सर, सुनिल चिपळूणकर, विनायक सावंत, शिवप्रेमी घाटगे, संजय गोरीवले, आश्विन पवार, साळूंखे सर अरुण शेलार, सूर्वे सर, राधिका तटकरे, दर्शना भाटवडेकर, अंजना ताई शिंदे, वासंती मोरे आदी उपस्थित होते.