
चिपळूण : चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठकीचे नियोजन पालकमंत्री यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे करण्यात आले होते. मात्र, या बैठकीसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला अधिकाऱ्यांनी का डावलले. हे राजकीय षड्यंत्र तर नाही ना ? अशा सवाल करीत ही बैठक कोणी लावली याची माहिती द्या. आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असल्याचे या आढावा बैठकीत बोलताना अधिकाऱ्यांवरती तोफ डागत आमदार भास्कर जाधव यांनी बैठकीचा सूर बदलून टाकला.
या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीचे लोकप्रतिनिधी म्हणून पत्रिकेत नाव असणे गरजेचे होते. आपल्याला जाणीवपूर्वक डावलले का याचा खुलासा त्यांनी मागितला. यावरती स्वतः पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांना सुनावले की हे चुकीच आहे. लोकप्रतिनिधी यांना सोबत घेत मान्सून पूर्व आढावा बैठक किंवा इतर बैठकांचे आयोजन करा. त्यामुळे एकमेकांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तर आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा हे सर्व खेळीमेळीच्या वातावरणात घेत काही सूचना या आढावा बैठकीत त्यांनी केल्या.
त्यांनी सांगितले की निश्चितच प्रांताधिकार् यानी कागदावर तयार केलेला नियोजनबद्ध आराखडा आणि त्यांनी प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्याची माहिती सुद्धा त्यांनी आपल्या या नियोजनबद्ध आराखड्यात दिली आहे. त्यांनी 2005 व 2019 आणि 2021 च्या पुराचा उल्लेख करत काय माहिती दिली. मात्र, 2007 ला सुद्धा असाच पूर आला होता याची माहिती ज्या संकलित करावी अशी त्यांनी सूचना केल्या.
त्याचबरोबर ज्या ठिकाणी दरडग्रस्त गावे आहेत. त्यांना तुम्ही मान्सूनपूर्व नोटीस काढून तुमचं काम झाले असे समजता. मात्र, तसं न करता यावरती कायमस्वरूपी उपाय काय करता येईल याची माहिती घेत तशी कारवाई करणे फार गरजेचे आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करा. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. मात्र तुम्ही जे काही ठिकाणी करता. ते सांगून करता किंवा ठरवून करता असा सुद्धा टोला त्यांनी लगावला आहे. 2021 च्या पूर्वांमध्ये एनडीआरएफ ची टीम उशिरा आली. रात्रभर तशीच बसून होती. मात्र, दुसऱ्या दिवशी एका वृद्धाला बाहेर काढताना दाखवत संपूर्ण व्हिडिओ समोर आणला. असे करणे चुकीचं आहे. यासाठी आराखडा नुसता कागदावर नसावा.
संभव धोके सांगून येत नसतात. निसर्ग नेहमी बोलत असतो .ते सुद्धा जाणून घेतले पाहिजे. आपल्या अनुभवानुसार त्यांनी सांगितले की , जमिनीला जिथे भेगा पडतात . त्या ठिकाणी कधीही जमीन खचत नाही किंवा दरड कोसळत नाही हा माझा अनुभव आहे. कारण अशावेळी जेव्हा जमीनला भेगा पडतात. तेव्हा त्यातील गॅस निघून जातो. त्यामुळे त्या ठिकाणी दरड कोसळण्याची भीती नसते यावेळी त्यांनी काही अशा घटना घडल्यांनंतरची काही गावे सांगितली. यावेळी त्यांनी आपल्या अनुभवाचे बोल या आढावा बैठकीत सांगितले.
त्यांनी वनव्यासंदर्भातला महत्त्वाचा प्रश्न या बैठकीत उपस्थित केला. वनवे लागत नाही तर ते लावले जातात. वनवे लागल्यानंतर निसर्ग साधन संपत्ती नष्ट होत आहेत. यावरती खास मोहीम काढत वणवे बंदी मोहीम सुरू करण्यासाठी आपण सत्तेत आहात त्यामुळे कायदा करावा अशी सूचना त्यांनी पालक मंत्र्यांना केली आहे. खरंतर काही पक्षी सुद्धा आपल्याला संकेत देत असतात. आता ही साधन संपत्ती नष्ट होताना खारुताई , पोपट, कावळे केकाटी, रानडुक्कर, भेकरी आणि ससे असे प्राणी सुद्धा आता या वाणव्यांमुळे नष्ट होत आहेत. यावर एक मोहीम काढावी. त्याचबरोबर शेती संदर्भात आढावा घेतला. खैर आणि बांबू लागवडी संदर्भात कृषी अधिकारी यांनी लोकांनापर्यंत पोहचून त्यांना लागवडीसाठी मार्गदर्शन करावे अशी सूचना केली.