
चिपळूण : अलोरे बौद्धवाडीतील नव्याने बांधण्यात आलेल्या बौद्धविहाराचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. विहारासाठी आमदार निकम यांनी व अतिशय चांगल्या प्रकारचा निधी मंजूर करून दिला होता. या उद्घाटनप्रसंगी आमदार निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत, विकासकामांबाबत आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. ग्रामपातळीवरील सुविधांचा विस्तार हा शासनाचा उद्देश असून, त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमी पुढे राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात भविष्यात समाजाच्या प्रगतीसाठी व मुलांच्या शिक्षणासाठी कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले.
उद्घाटन सोहळ्याला प्रदेश प्रतिनिधी शौकतभाई मुकादम, विधानसभा अध्यक्ष रमेशजी राणे, विनोदजी झगडे, अशोकभाई कदम, युवक अध्यक्ष निलेश कदम, मूयुरजी खेतले,मनोहरजी मोहिते, राजुजी जाधव, श्रीधर जाधव, मनीषा जाधव, रिया कांबळे, राकेश जाधव, तुषार चव्हाण, विकासजी गमरे, अविनाश कोलगे, प्रसाद लाड, राजेश चव्हाण, सुरेश कदम, दत्ता बंगाल, कृष्णा बंगाल, देवा मोहिते, मुकुंद जाधव, अशोक मोहिते, अमोल जाधव, गौतम जाधव, निशिकांत जाधव, प्रकाश जाधव, वैभव जाधव, यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नविन विहाराच्या उभारणीमुळे गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व शासकीय उपक्रम राबविण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे.