
चिपळूण : चिपळूण अर्बन बँकेला पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि, पुणे यांचा "शून्य टक्के एन् पी.ए." पुरस्कार
बँकेने सन २०२३-२४ सालात चागंली कामगिरी करून बँकेचा एन.पी.ए. "शून्य टक्के" ठेवण्यात यश मिळविल्यावददल पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि, पुणे यांचेकडून "शून्य टक्के एन.पी.ए." पुरस्कार प्राप्त झाला आहे. सदरचा पुरस्कार वितरण कार्यक्रम "के. विजय तेंडुलकर सभागृह" राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कुल अॅन्ड सायन्स ज्युनियर कॉलेज पर्वती पुणे येथे दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला.
हा पुरस्कार नामदार मुरलीधर मोहोळ साहेव, सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्य मंत्री, भारत सरकार, श्री. दिपक तावरे साो भा.प्र.से. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री. सतिश मराठे सो, राज्य बँकेचे प्रशासक विदयाधर अनारकर, वैकुंठभाई मेहता संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले यांच्यासह रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री. सतीश मराठे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, यांच्याकडून सदरचा पुरस्कार बैंकेचे अध्यक्ष श्री. मोहन मिरगल, माजी अध्यक्ष श्री निहार गुढेकर, संचालक श्री. समीर जानवलकर, श्री रत्नदीप देवळेकर व सीईओ श्री. संतोष देसाई यांनी स्विकारला चिपळूण अर्बन बँकेचे नियोजनबध्द कामकाजाचे उपस्थितांनी कौतुक केले.
बँकेचे सभासदांनी आपली कर्ज खाती नियमित ठेवल्याने व वसुलीस सहकार्य केल्यानेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकेस सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सभासद, ग्राहक व कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. थकवाकी वसुलीसाठी बँकेचे तात्कालिन अध्यक्ष श्री निहार गुढेकर, उपाध्यक्ष श्री. निलेश भुरण, सीईओ श्री. संतोष देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वसुलीसाठी सेवकवर्गाने नियोजनबध्द घेतलेले परिश्रम यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे अध्यक्ष मोहन मिरगल व उपाध्यक्ष श्री रहीमान दलवाई यांनी सांगीतले.