
चिपळूण : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत कलामहाविद्यालयालयीन स्थरावर मूलभूत अभ्यासक्रम या विभागातील ज्योती पांचाळ -प्रथम,आदित्य सावरटकर व मिथिल अंगचेकर -द्वितीय, कुमारी. मुक्ती गडदे - तृतीय कलाशिक्षक पदविका विभाग - सोनल घाणेकर -प्रथम, तन्वी गोरीवले -द्वितीय, श्रावणी कुळे -तृतीय रेखा व रंगकला विभाग इंटरमिजीएट - सौरभ साठे -प्रथम, सिद्धार्थ भोवड -द्वितीय,चिन्मय वडपकर-तृतीय रेखा व रंगकला विभाग डिप्लोमा - सुजल निवाते -प्रथम, तुळशी भुवड -द्वितीय,साक्षी रेवणे -तृतीय
यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के ,सर्व स्कुल कमिटी सदस्य , कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२५/२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.अंतिम तारीख ६ जुलै २०२५ आहे.