चिंदर गुरे मृत्यूप्रकरण ; भाजपकडून प्रत्येकी 5000ची मदत देणार

भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: July 11, 2023 20:18 PM
views 117  views

सिंधुदुर्गनगरी :  मालवण तालुक्यातील चिंदर गावातील पशुपालक शेतकऱ्यांना मोठ्या संकटास सामोरे जावे लागले आहे. या गावात  अज्ञात आजाराने ४० जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जनवांना हिमोरोजिक फिवर असल्याचे समोर येत आहेत. या दुर्दैवी घटनेबाबत शेतकऱ्यांवरील या संकटाबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण  संवेदनशील पणे हा विषय हाताळत आहेत. भाजपा मार्फत प्रती जनावर पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून  बुलेट नेपियर  चारा निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर याने यासंदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले.

        याबाबतची खास पत्रकार परिषद  सिंधुनगरी येथे झाली. यावेळी   यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर उपस्थित होते.

        जनावरांच्या मृत्यू बाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती मिळताच त्यांनी या सर्व परिस्थितीचा तत्काळ आढावा घेतला. तसेच या संपूर्ण परिस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. शिवाय या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून भारतीय जनता पार्टीमार्फत प्रति जनावर ५ हजार रुपये देण्यात येत आहेत. पशुपालकांनी पुढील काही दिवस आपली जनावरे मोकाट सोडू नये गोठ्यात ठेवावीत असे आवाहन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

      


 चिंदर गावत जनावरांचा होत असलेला मृत्यू हा प्राथमिक अहवालानुसार हिमोरेजिक फिवर मुळे होत आहे. या मृत जनावरांची संवेदनशील पालकमंत्र्यांनी दाखल घेत तात्काळ उपाय योजना करण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना दिले असून, भाजपच्या माध्यमातून मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे.तर अनाथ झालेल्या गाईंच्या वासरांसाठी दूध मिळावे यासाठी  गोकुळच्या माध्यमातून मिल्क रिफ्रेसर पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

     चिंदर गावात सध्या बैल,म्हैस,गाई अशी पाळी  जनावरे अचानक मृत होऊ लागली आहेत.आतापर्यंत ४१ पाळीव जनावरे मृत झाली आहेत.याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजांबाबत श्री काळसेकर हे पत्रकारांशी बोलत होते.

    यावेळी बोलताना श्री काळसेकर म्हणाले की,चींदर तालुका मालवण येथे कोणत्यातरी आजाराने जनावरे मृत होत आहेत.ही बातमी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना समजताच संवेदनशील अशा पालकमंत्र्यांनी या विषयाची तात्काळ दाखल घेत या जनावरांचा मृत्यू थांबविण्यासाठी जे जे प्रयत्न करणे शक्य आहे असे प्रत्येक प्रयत्न तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.त्याच बरोबर भाजपा कार्यकर्त्यांनाही प्रत्यक्ष चींदर गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना काय काय मदत करता येईल ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

   त्या प्रमाणे भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते कामाला लागले आहेत.चींदर गावात एकूण ६५० तेवढी जनावरे आहेत.याती आत्तापर्यंत ४१ जनावरे मृत झाली आहेत.म्हणजे सुमारे ८ टक्के जनावरे मृत झाली आहेत.अजूनही काही जनावरे दगावण्याची शक्यता आहे.मात्र असे होऊ नये यासाठी गेले तीन दिवस जिल्हा परिषद पशुवैद्यकीय यंत्रणा आणि प्रशासन काम करत आहे.या गावातील सर्व जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.मात्र एकाच गावात येवढ्या जनावरांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब  आहे.त्यामुळे शासन आपले सर्व प्रयत्न करत आहेच त्यासोबत भाजपा ही येथील जनतेच्या मदतीस सरसावली आहे.

     चिंदर गावामध्ये होत असलेला जनावरांचा मृत्यू हा प्रथम अहवालानुसार हिमोरेजिक फिवर मुळे होत आहे.सध्या पावसामुळे जो नवीन हिरवा चारा आला आहे.तो चारा जनावरे मोठ्या प्रमाणात खात  आहेत. या ओल्या चाराऱ्यावर काळी बुर्शी असल्याने हा ताप जानावरांना येत आहे.यात जनावरांच्या शरीरातील क्यालशियम,प्लेटलेट कमी होतात.शरीरात गाठी तयार होतात.आणि रक्तस्त्राव होऊन ही जनावरे तात्काळ म्हणजेच २४ तासांत मृत्युमुखी पडत आहेत.हे प्रचंड दुर्दैवी आहे.

   या साठी तात्काळ मदती सोबतच जिल्ह्यातील सर्व जनावरांना कायमस्वरूपी ओल्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी जिल्हा परिषद च्या मध्यामतून झाराप येथील जी प च्या १७ एकर जमिनीवर बुलेट नेफिअर चाऱ्याची लागवड करण्याचे निश्चित केले आहे.तर चींदर येथील जनावरे पुढील १५ दिवस बाहेर सोडूनाये त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्यासोबताच शुद्ध पाण्याचीही रचना करण्यात येत आहे.तसेच अनाथ झालेल्या वासरांना दूध मिळावे यासाठी गोकुळच्या माध्यमातून मिल्क रिफ्रेसर आणण्यात येत असून ते उद्या साकळपर्यंत चींदर मध्ये पोहोचणार असल्याचेही अतुल काळसेकर यांनी सांगितले.

                डॉ कांबळे यांचे काम विशेष

चिंदर गावात हा प्रश्न निर्माण झाल्यापासून आत्ता पर्यंत पशू वैद्यकीय अधिकारी डॉ कांबळे हे दिवस रात्र काम करत आहेत.ते प्रत्येक पशू सेवकाकडे जाऊन त्यांच्या जनावरांवर उपचार करत आहेत. त्यांचे हे काम खूप महत्व पूर्ण असून त्यांचे हे काम विशेष असल्याचेही श्री काळसेकर यांनी सांगताना डॉ कांबळे यांच्या कामाची उपस्थितांनी प्रशंसा केली.