
सावंतवाडी : आजचे युग मोबाईल युग झाले आहे. प्रत्येक मुलाच्या, पालकांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईलच्या युगापासून दूर जायचे असेल तर तुम्ही साहित्य वाचन करायला हवे. जेव्हा मुले आणि पालक पुस्तकांत डोकावतील तेव्हाच खऱ्या अर्थान जीवन जगण्याचे नवे तंत्र मिळेल बाल साहित्य संमेलन विद्यार्थ्यांना जगण्याची नवी प्रेरणा देईल, असे मत सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. एम नाईक यांनी व्यक्त केले.
'शंभर दिवस शंभर कवी' कार्यक्रमांतर्गत सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने शालेयस्तरावर राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात शुक्रवारी एकदिवशीय बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक वीरधवल परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विश्कारापिकाचे सदस्य मा.ल. देसाई, आरपीडी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, लक्ष्मीदास ठाकुर आदी उपस्थित होते.
वीरधवल परब म्हणाले, सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी कल्पकतेने बालसाहित्य संमेलन भरविले आहे. आज मुलांमध्ये सुप्त गुण दडले आहेत. पण ते मोबाईलच्या डब्याने हिरावून घेतले आहेत. आज पालक, विद्यार्थी सर्वच या मोबाईलच्या युगात स्वतःला हरवून बसले आहेत की काय, असे वाटते तुम्हाला यापासून दूर व्हायचे असेल तर अशी साहित्य समेलने झाली पाहिजेत. या संमेलनात शाळकरी मुलांनी जे साहित्य वाचन केले आणि सादरीकरण केले हे पाहता पुढील काळात हीच मुले महाराष्ट्राची साहित्य चळवळ व संस्कृती पुढे नेतील बाल साहित्य संमेलनानिमित सावंतवाडी केशवसुत कट्टा ते आरपीडी हायस्कूलपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिव्यल गावडे,शाळा इन्सुली ने ४ हिने कथा (पैशांचा पाऊस), चिन्तयी सावत, शाळा देवसू संवाद लेखन, (वृक्षारोपण) ममता घाडी, सावंतवाडी नं. ४. प्रवास वर्णन (माझी रम्य सहल) जान्हवी मुळीक, आजगाव नं १ पुस्तक परिचय, (मृत्युंजय), नव्या राऊळ, शिराशिंगे नं. १ व्यक्तिचित्र (शाहू महाराज), नित्या गवस, नेतई नं. १ कविता (वाचन संस्कृती), श्रेया भालेकर, माडखोल नं २ धवडकी आदी विद्याथ्यांनी या बाल साहित्य संमेलनात सहभाग घेतला.
यावेळी मुलांनी तयार केलेल्या साहित्य संग्रहाचे प्रकाशन गटविकास अधिकारी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी शासनाच्या माध्यमातून शंभर दिवस शंभर कवी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त बाल साहित्य संमेलन घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. देवसू शाळेची विद्यार्थिनी मंजिरी देऊस्कर हिने सूत्रसंचालन केले. शिक्षक मनोहर परब, दत्ताराम सावंत, महेश पालव, गोपाळ गावडे, वंदना सावंत, विनय गावडे, नीता सावंत, समीर जाधव प्रणिता भुयर, राजेंद्र चव्हाण, श्री ठाकुर आदीनी बाल साहित्य संमेलन यशस्वी केले