
सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २ मधील अंगणवाडी क्रमांक १५ च्या चिमुकल्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या माता आणि गुरुजनांना वंदन करून गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरु शिवाय ज्ञान नाही, मातेशिवाय जन्म नाही. त्यामुळे गुरुजनांचा आदर करा, त्यांना मानसन्मान द्या अशी शिकवण या निमित्ताने अंगणवाडीतून देण्यात आली. तर प्रत्येकाची माता ही प्रथम गुरु असते. आपल्या आईकडून त्यांना पहिला धडा मिळतो. या भावनेतून गुरुपौर्णिमेनिमित्त या तीन वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या माता आणि पालकांना औक्षण करून त्यांना वंदन केले. यामध्ये प्रिशा भिसे, रोहित मुंज, शौर्य निरतवडेकर, शिवण्या गवळी, समर्थ काष्टे, सावी नेवगी, शुभ्रा गावडे, रुद्र लाखे , विराज लाखे, रिद्धिमा किटलेकर, दिया पेडणेकर, प्राप्ती गवळी, भार्गवी मुंज, प्रियांशी गुप्ता, राजवीर दळवी, साईश करपे,श्रीयांश गुप्ता, जयवंत भाटी, रॉय डिसोजा, योगिता चव्हाण, गीतांश मुंज या चिमुकल्यांचा समावेश होता. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर व त्यांच्या माता पालक पूजा मुंज, प्रतिभा दळवी, नेहा काष्टे, माधुरी गवळी, राधिका मुंज, गौतमी गवळी, स्वानंदी नेवगी यांची उपस्थिती होती.










