
सावंतवाडी : येथील सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेत पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस म्हणजेच 'बालदिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
यानिमित्त प्रशालेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परिपाठ सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांना पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे आवडते कार्टून मिकी माऊस व मोटू यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य करून बालमनाचे मनोरंजन केले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. मिकी माऊस व मोटू ही गंमतीदार पात्रे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली होती.