कळसुलकर प्राथमिक शाळेची मुले निघाली वारीला

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2025 19:51 PM
views 49  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेतील मुलांनी पांडुरंगाची आस लागल्याने या चिमुकल्या मुलांनी कळसुलकर शाळा ते सावंतवाडीतील प्रसिद्ध संस्थानकालीन विठ्ठल मंदिर पर्यंत वारकरी दिंडी वादक गाजत काढण्यात आली.


 यावेळी शहरात भक्तीने वातावरण निर्माण झाले वारकरी दिंडी पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी केली होती. मुलांनी विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माउली,संत सावताबाई,जनाबाई, मुक्ताबाई, अशा विविध संतांच्या व्यक्तिरेखा साकारल्या यावेळी मंदिर प्रशासनाकडून मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची  160 मुले वारीमध्ये सहभागी झाली होती. पांडुरंगाचा जयघोष करत बाजारपेठेतून विठ्ठल मंदिरा पण आल्यानंतर सर्व मुलांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. त्यानंतर विठ्ठलाचे अभंग, प्रार्थना तसेच मुलानी रिंगण करून विविध कार्यक्रम सादर केले. ही शाळा आपल्या विविध उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे शालेय गुणवंता सोबत मुलांना संस्कृतीक कार्यक्रमासाठी मुलांना प्रोत्साहित करीत असते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत ,शिक्षक डी जी वरक, अमित कांबळे, जोत्सना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ,संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर ,पायशेट, तसेच संस्थेचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी शिक्षक पालकसंघ पदाधिकारी, माता पालक संघ पदाधिकारी,सर्व पालक वर्ग विद्यार्थी यावेळी उपस्थित होते,