
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना UPSC, MPSC परीक्षा पास होण्यास मार्ग सोपा व्हावा यासाठी प्रकाश बांदेकर यांची एकेडमी ऑफ कॅम्पेटिव्ह एक्झामिनेशन सुरू होत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूल देखील कलेक्टर होतील असा विश्वास श्री बांदेकर यांनी दर्शवला.
UPSC परीक्षा पास होणं फार कठीण नाही. समस्यांचं समाधान हे आपल्या अवतीभवती असते ते आपण शोधन गरजेचं आहे. UPSC व MPSCचा सिल्याबस हा या वर्षी सारखच असणार आहे. बोर्डात चांगल्या गुणांनी पास होणारे UPSC परीक्षेत चांगले गुण नाही प्राप्त करत कारण त्यांना आपली बौद्धिक कक्षा वाढवण गरजेचे आहे आणि ते करण्यासाठी हे क्लास मदत करणार आहे.
उत्तरप्रदेश, बिहार ची मुलं सातवी पासूनच आपला मार्ग ठेवतात. आपली लोक या विषयात मागे पडत आहेत. दहावी पूर्वी जर आपल्या मुलांनी ठरवलं तर अभयसक्रम सोपा होईल. कमी वयात मुलं या परीक्षेत उत्तीर्ण झाले तर त्यांना चांगल्या संधी मिळतील बांदेकर यांनी दर्शवला विश्वास.