
सावंतवाडी : स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊया...! समिती तर्फे स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतीप्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धेत रूद्र शिंदे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक स्वराली पांगम तर प्रत्युष जाधवने तृतीय क्रमांक पटकाविला. याच कार्यक्रमाचं औचित्य साधून स्व. सुभानराव दत्ताजीराव भोसले स्मृती प्रित्यर्थ सामाजिक, शैक्षणिक सेवा सन्मान देऊन गुरूवर्य, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वर्गीय भोसले सरांनी विद्यार्थ्यांना नेहमीच व्यासपीठ देण्याच काम केलं. त्यांची ही संकल्पना जपाणाऱ्या नव्या पिढीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ नागरीक संघाचे सल्लागार अण्णा देसाई यांनी काढले. अध्यक्षीय भाषणादरम्यान ते बोलत होते.
स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले-तळीकर प्रतिष्ठानच्या आपण व्यक्त होऊया...! समिती तर्फे स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृतीप्रित्यर्थ बालवाडी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वैयक्तिक बालगीत सादरीकरण स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. नागवेकर म्हणाले, प्रा.भोसले सर माझे सहकारी होते. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते. प्रत्येक उपक्रमात त्यांचे स्मरण नेहमी होत राहते असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कोमसाप उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, प्रा. रूपेश पाटील, दीपक पटेकर आदी उपस्थित होते.
बालगीत सादरीकरण स्पर्धेत एकापेक्षा एक सरस अशी ३० सादरीकरणनं विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी रूद्र शिंदे ठरला. द्वितीय स्वराली पांगम, तृतीय प्रत्युष जाधव ठरले. उत्तेजनार्थ क्रमांक दिक्षा टिळवे, अर्णव राऊळ यांनी प्राप्त केला. नंदन कुमठेकर याला उत्तम सादरीकरणासाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेच परिक्षण वर्षा देवण-धामापुरकर व उमा तिळवे यांनी केलं. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव स्व. सुभानराव दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक, शैक्षणिक सेवा सन्मान देऊन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे सचिव, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना माजी प्राचार्य श्री. नाईक म्हणाले, विद्यार्थ्यांचा गराडा सभोवती असणारे शिक्षक मिलिंद भोसले होते. समाजसेवा हा त्यांचा आवडता गुण होता. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली, असंख्य विद्यार्थी घडवले. विद्यार्थी हा श्वास आहे या भावनेतून त्यांनी काम केल्याचे उद्गार काढले. ज्येष्ठ नाट्यकर्मी भाऊ साळगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना बालगीतांमुळे पुन्हा एकदा बालपण आठवल्याची भावना व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार हनुमंत उर्फ अण्णा देसाई पुढे म्हणाले, मुलांनी व्यक्त व्हावं यासाठी घेतलेली स्पर्धा कौतुकास पात्र आहे. यासह सरस्वतीच्या मंदिरातील प्रमुख मानकरी गुरुवर्य व्ही. बी. नाईक सर यांचा सन्मान करता आला याचा आनंद अधिक आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेत. निश्चित स्पर्धेला उपस्थित विद्यार्थी नवी प्रेरणा घेऊन जातील असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, मंगल भोसले,मानसी भोसले,सोमा सावंत, हेमंत खानोलकर, अरूण मेस्त्री, निलेश मेस्त्री, प्रा. नमिता भोसले, सर्वेश राऊळ, आत्माराम धुरी, केतकी सावंत, मधुरा खानोलकर, भावना सावंत, गोविंद मळगावकर, पुरूषोत्तम केळुसकर, समीर म्हाडगूत आदींसह स्पर्धक विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक गांवस यांनी केले. सूत्रसंचालन गौरवी घाटे हीने तर आभार आपण व्यक्त होऊया समितीचे प्रमुख निरज भोसले यांनी मानले.