
कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत लहान बालकांना सायबर गुन्ह्यां पासून स्व - संरक्षण कायद्याची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे अशिकारी सौ सावंत सौ चौगले यांनी दिली. बाल गुन्हेगारी बालमजूर बालविवाह सायबर गुन्हेगारी मोबाईल अतिवापर या संबंधित विषयांचे मार्गदर्शन करून प्रशालेतील विद्यार्थांना स्वतःचे संरक्षण कसे करावे पोलीसांची मदत कशी मिळवावी या विषयी मार्गदर्शन केले.
आज ही काळाची गरज आहे. आजची पिढी आधुनिक तंत्र ज्ञानामुळे भरकटलेली आणि दिशाहिन होत आहे. यासाठी समुपदेशन करणे महत्वाचे आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक पी जे कांबळे यांनी या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रास्ताविक आणि पोलीस अधिकारी यांची ओळख पर्यवेक्षक अच्युतराव वणवे यांनी करून दिली. या कार्यक्रमाला प्राथमिक स्तरावरील इयत्ता सातवीचे विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री दरवडा, श्री नागभिडकर, सौ तायशेटे, सौ लिमये, श्री अनंत बिडये उपस्थित होते.