
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या १६ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सावंतवाडीत भेट दिली. सभास्थळी त्यांनी पाहणी केली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याकढून सुरक्षिततेचा आढावा पोलिस अधीक्षकांंनी घेतला. उद्या दुपारी ३ वाजता सावंतवाडी , गांधी चौक येथे ही जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.